Akshay Kumarचा नवा विक्रम; ३ मिनिटांत १८४ सेल्फी काढून गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद | Selfie Movie

2023-02-23 36

बॉलिवूडचा खिलाडी अक्षयकुमार गेल्या काही दिवसांपासून त्याच्या आगामी सेल्फी चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट २४ फेब्रुवारीला थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे. यादरम्यान अक्षय कुमारने ३ मिनिटांत चाहत्यांसोबत १८४ सेल्फी काढले. यासह त्याने गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नव्या विक्रमाची नोंद केली. यापूर्वी 3 मिनिटांत सर्वाधिक सेल्फी घेण्याचा विक्रम अमेरिकेच्या जेम्स स्मिथच्या नावावर होता, त्याने १६८ सेल्फी क्लिक केले होते. आता मात्र अक्षयने हा विक्रम मोडीत काढला आहे

Videos similaires